Parbhani : परभणी बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानं, वाहनांवर दगडफेक; जाळपोळ

Parbhani : परभणी शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परभणीतील वातावरण चांगलेच तापले आहे आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी आज परभणी बंदची हाक दिली. परभणी शहरातील जिंतूर रोडवर आंबेडकरी अनुयायांनी रस्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाला आता हिंसक वळण आले आहे. पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले आहेत.

परभणी बंदला हिंसक वळण आले आहे. संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली. वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिस आणि जमाव आमनसामने आला असून पोलिसांकडून जमावाला हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी संतप्त झालेल्या जमावावर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या परभणीमध्ये तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Pune : क्रौर्याची परिसीमा! बाळाला रस्त्यावर फेकलं, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंडाला बांधली पिशवी

संतप्त आंबेडकरी अनुयायांनी ताडकळस येथे धानोरा टी पॉईंट पोलिस स्टेशनच्या समोर निषेध रॅली काढत रस्तारोको केला. संतप्त आंदोलकांनी परभणी शहरातील रेल्वे स्टेशन रोडबाहेर ठेवलेले पाईप ३ ठिकाणी पेटवून दिले. या भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून संतप्त जमावावर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावेळी जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परभणीमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली आहे. परभणीमधील परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा ताफा वाढवण्यात आला आहे.

परभणी शहरातील सात ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटून देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात येत आहे. दरम्यान, संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याची नार्कोटेस्ट करत या व्यक्तीच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी आंबेडकर अनुयायांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply