Parbhani Maratha Andolan : परभणीत मराठा आंदाेलक आक्रमक, पूर्णा तहसील कार्यालयास लावली आग, सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Parbhani News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आठवड्यापासून आंदाेलन सुरु आहे. काही जिल्ह्यांत आंदाेलनास हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. आज (बुधवार) परभणी  जिल्ह्यातील पूर्णा तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचे समाेर आले.

परभणी जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मराठा आंदोलनकर्त्यांनी भिंतीवरून उडी मारून तहसील कार्यालयात प्रवेश केला हाेता. तेथेच आंदाेलनकर्त्यांनी घोषणाबाजीर करत थेट तहसीलदार यांच्या वाहनास लक्ष्य केले. यावेळी आंदाेलनकर्त्या युवकाने तहसीलदारांच्या वाहनाच्या काचा फाेडल्या. त्यामुळे वाहनाचे माेठे नुकसान झाले.

Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील किरकटवाडी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

दरम्यान आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही युवकांनी घोषणाबाजी करत पूर्णा तहसील कार्यालयात आंदाेलन केले. यावेळी काही आंदाेलकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात पेट्रोल टाकून कार्यालयास आग लावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान अग्निशमन दलाने काही वेळातच कार्यालय परिसरात लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी हानी टळली. त्यानंतर या परिसरात राज्य सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply