Parbhani : वन विभागाने आवळल्या चंदन चोर टोळीच्या मुसक्या; तब्बल १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Parbhani Crime : परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात अवैध चंदन तस्करी करणाऱ्या चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत तब्बल पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना आणि वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील आंबेगाव शिवारात अवैध चंदन तस्करी करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांना आणि वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली आहे. आंबेगाव शिवारात शेतीला केलेल्या भिंतीच्या कुंपणाच्या आत अनेक दिवसांपासून चंदन तोड करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या कारवाईमध्ये 235 किलो चंदन चिप्स आणि गोल चंदन 36 किलो चंदन जप्त करण्यात आले. तसेच यावेळी 8 मोबाईल,11 मोटरसायकल सह चंदन तस्करी करण्यासाठी लागणारे साहित्य, हत्यारे आणि अकरा आरोपी वन विभागाने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणात विभागीय वनविभागात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सदरील कारवाईत सुमारे 15 लाख रुपयांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चंदन तस्कर टोळीकडून साठवणूक ठेवण्यात आलेले चंदन आणि इतर तपासण्याची प्रक्रिया वनविभागाचे अधिकारी करत आहेत अशी माहिती रवींद्र जोशी विभागीय वनाधिकारी परभणी यांनी दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply