Parbhani Accident News : भरधाव वेगात आले अन् थेट नदीत कोसळले; भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Jintur Bike Accident : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जिंतूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नदीवरील चौथा पूलावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणारी दुचाकी थेट पुलावरून खाली कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला. 

ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. कैलास गौतम मस्के (वय ४० वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिंतूर येथे हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास मस्के हे वसमत तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी असून ते छत्रपती संभाजीनगरवरून मित्रासोबत गावाकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.

चारठाणाजवळ चौथ्या पूल नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुलावरून दोघे जात असताना दुचाकीचा वेग जास्त असल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट पुलाच्या कठड्याला धडकली. या धडकेत दोघेही पुलावरून खाली नदीत कोसळले.

पुलाची उंची २५ ते ३० फूट असल्याने या घटनेत कैलास यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आधार कार्ड वरून कैलास गौतम मस्के हेच असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चारठाण येथील युवकांच्या मदतीने दोघांनाही नदीच्या बाहेर काढले. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता, यातील कैलास यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply