Pappu Kalani : पप्पू कालानींनी 11 वर्षानंतर केले मतदान, जन्मठेपेची झालेली शिक्षा

Ulhasnagar News: जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर आलेले माजी आमदार पप्पू कालानी यांनी तब्बल 11 वर्षानंतर कल्याण लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.

ते उघडपणे प्रचारात उतरल्याने आणि त्यांनी मतदानाची हाक दिल्याने प्रथमच सिंधी मतदार मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी झाल्याचे चित्र उल्हासनगरात दिसून आले आहे.अशी माहिती कालानी कुटुंबियांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक मनोज लासी यांनी दिली आहे.

कल्याण सत्र न्यायालयाने पप्पू कालानी यांना 3 डिसेंबर 2013 रोजी इंदर बठीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती होती.

Gautam Gambhir : 'मी त्यांचे पाय धरले नाही म्हणून...' गौतमच्या गंभीर वक्तव्याने खळबळ

2021 मध्ये पप्पू कालानी यांची पत्नी,माजी आमदार ज्योती कालानी यांचे निधन झाल्यावर पप्पू कलानी यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती.

हा कोविडचा काळ असल्याने 72 वर्षाच्या वरील कैद्यांना कैदेतून मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला.त्याचा फायदा पप्पू कालानी यांना झाला आहे.दरम्यानच्या काळात महापालिका विसर्जित होऊन निवडणूक लागली नाही.त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नव्हता.

कल्याण लोकसभा निवडणुकीत टीओके प्रमुख ओमी कालानी यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पाठींबा जाहीर करून दोस्ती का गठबंधन तयार केले.एकीकडे भाजपा,शिवसेना,आठवले गट,मनसे,साईपक्ष हे श्रीकांत शिंदे यांचे काम करत असतानाच दुसरीकडे दोस्ती का गठबंधनच्या प्रचाराची धुरा पप्पू कलानी,ओमी कालानी यांनी हाताळताना चौकाचौकात फिरून असंख्य कॉर्नर मिटींगा घेतल्या आणि श्रीकांत शिंदे यांच्या धनुष्यबाण या निशाणीचा प्रचार करून मतदानासाठी बाहेर पडण्याची हाक दिली.त्यामुळे मोठया संख्येने सिंधी मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी झाला होता.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply