Paper Leak In Amravati : एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी; अमरावती पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती उघड

Paper Leak In Amravati : २१ फेब्रुवारी रोजी अमरावतीत मृदा आणि जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. यात परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीच पेपर फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी एकूण २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे अमरावतीत युवक काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरत आंदोलन केलं आहे.

11 आरोपींना अटक

राज्यात ६७० पदासाठी मृदा आणि जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. पण अमरावतीत या परीक्षेत गैरप्रकार झाला. कर्मचाऱ्यांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांना उत्तरे लिहून दिली. या मध्ये परीक्षा घेणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांसह 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Palghar News : रुग्णालयातील स्लॅब थेट प्रसुती वार्डमधील बेडवर कोसळला; पालघरमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी

या प्रकरणी एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यात तब्बल 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थीसह युवक काँग्रेसने सरकार विरोधात घोषणाबाजी करत झालेली परीक्षा रद्द करण्याची मागणी केलीये.

 

झालेली परीक्षा रद्द करा आणि नव्याने परीक्षा घ्या तसेच या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी आनखी मोठे अधिकारी आणि नेत्यांचा समावेश आहे त्यामुळे मोठे मासे पकडले पाहिजे अशी मागणी सुद्धा युवक काँग्रेसने यावेळी केलीये.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply