Pandharpur News : विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील जातीयतेची उतरंड मांडणारी आरती बंद करा : डाॅ. भारत पाटणकर

Pandharpur News : बडवे - उत्पातांच्या जोखडातून पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर‌‌‌ मुक्त होवून आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु दहा वर्षानंतर देखील पंढपूरातील  विठ्ठल रूक्मिणी मंदिर  शंभर टक्के मुक्त झाले नाही‌. आज ही जातीयतेची उतरंड मांडणारे पुरूष सुक्त देवापुढे म्हटले जाते. जो पर्यंत मंदिरातील पुरूष सुक्तची आरती बंद होणार नाही, तो पर्यंत मंदिर शंभर टक्के मुक्त झाले असे म्हणता येणार नाही अशी खंत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी आज (बुधवार) व्यक्त केली. 

भारत पाटणकर म्हणाले 17 जानेवारी 2014 साली विठ्ठल रूक्मिणी मंदिर‌‌‌ हे बडवे उत्पात यांच्या ताब्यातून मुक्त झाले. त्यानंतर मंदिराचे व्यवस्थापन हे सरकारकडून केले जाते. 17 जानेवारी हा दिवस विठ्ठल मंदिर मुक्ती दिन‌ साजरा केला जातो.

Dhangar Reservation : अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरेल; आरक्षणासाठी सरकारला २६ जानेवारीपर्यंतचा अल्टीमेटम

विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुक्तीसाठी अनेक वर्षे लढा दिला. आजही तो आमचा सुरू आहे. काही लोक आमचा लढा मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायालयात देखील आम्ही तो लढू. गेल्या दहा वर्षांमध्ये आरती सोडली तर 75 टक्के मंदिर मुक्त झाले आहे.

उतरंडीची आरती बंद करावी अशी आमची मागणी आहे. ही प्रथा बंद करण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून लढा सुरू असल्याचे पाटणकर यांनी नमूद केले. दरम्यान मुक्ती दिनाच्या निमित्ताने आज पेढे वाटून आनंद व्यक्त केला गेला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply