Pandharpur News : पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावर भीषण अपघात, कपड्यांनी भरलेला ट्रक जळून खाक; 80 लाखांचे नुकसान

Pandharpur News : पंढरपूर जवळ मालवाहतूक ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे. तसेच ट्रेलर देखील जळाला आहे. यामुळे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूर पासून जवळ असलेल्या आढीव गावाजवळ घडला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठी असल्याने कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे.
 
यामध्ये सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक आता सुरळीत केली.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply