Pandharpur News : विठुरायाच्या दानपेटीत साडेतीन कोटी; माघी यात्रेत लाखो भाविकांकडून दान

Pandharpur News : नुकत्याच संपन्न झालेल्या माघी यात्रेनिमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या  दर्शनासाठी दाखल झाले होते. या भाविकांकडून विठुरायाच्या दानपेटीत ३ कोटी ५० लाख रूपयांचे दान टाकण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा देणगीमध्ये २३ लाखांनी वाढ झाली आहे. 

पंढरपूर च्या प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेल्या माघी यात्रेसाठी यंदा तीन ते चार लाख भाविक पंढरपूरमध्ये आले होते. या यात्रे दरम्यान भाविकांनी विठुरायाच्या चरणी भरभरून दान अर्पण केले आहे. यामध्ये देवाच्या चरणावर सर्वाधिक २३ लाख ९९ हजार रूपयांचे दान अर्पण केले आहे. तर लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला तब्बल ३९ लाख ४४ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. साधारण विठुरायाच्या मंदिर दानपेटीत साडेतीन कोटीचे दान आले आहे.

Pune Village Sold : गाव विकणे आहे; पुणेकरांनी चक्क गावच विकायला काढले, महापालिकेवर राेष

 यंदा देणगीत वाढ 

पंढरपूमध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी स्वरूपात दान केले जात असते. माघी यात्रेत आलेल्या भाविकांकडून देण्यात आलेले दान हे मागील वर्षीच्या तुलनेत २३ लाखाने जास्त आले आहे. यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही विठुरायाच्या देणगीमध्ये मोठी वाढ झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply