Pandharpur News : भगव्या पोशाखात खुललं सावळ्या विठुरायाचे रुप; अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंढरपूर सजले

Pandharpur News : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सोनेरी रंगाने सजलं आहेत. मंदिरात केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर विठुरायाला भगवा पोशाख घालण्यात आला आहे. या पोशाखात विठुरायाचं सावळं रुप अधिकच खुलून दिसत आहे. 

विठुरायाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे. रामनामाच्या गजराने अवघे पंढरपूर दुमदुमून गेले आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी चौखांबी, सोलखंबीला केशरी रंगाच्या फुलांची अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे दृश्य पाहून भाविक भारावून गेले आहेत.

Pune News : सेल्फीमुळे घात झाला! बुडणाऱ्या दोन बहिणींना वाचवण्याच्या नादात भावाचा जीव गेला

अयोध्येतील प्रभू श्रीराम मू्र्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या जो उत्साह देशभर साजरा केला जात आहे. तोच उत्साह आणि आनंद दक्षिण काशी असलेल्या विठुमाऊलीच्या राऊळीत देखील साजरा केला जात आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी सोनेरी रंगाच्या फुलात नटली आह

मंदिरात केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर विठुरायाला आज भगवा पोषाख परिधान करण्यात आला आहे. याशिवाय संत नामदेव पायरी जवळ प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सिता आणि हनुमान यांच्या पानाफुलांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply