Pandharpur : विठुरायाच्या प्रसादाला भाविकांकडून मागणी; लाडू विक्रीतून विठ्ठल मंदिराला दहा लाखांचा नफा

Pandharpur : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या लाडू प्रसादाला भाविकांकडून मागणी वाढली आहे. मंदिर समितीने ठेकेदारी पध्दत रद्द करून स्वतः लाडू तयार करून त्याची विक्री सुरू केली आहे. या लाडू विक्रीतून मंदिर समितीला एकाच महिन्यात सुमारे दहा लाखांचा नफा मिळाला आहे.

विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला येणारे भाविक हमखास विठुरायाचा प्रसाद म्हणून लाडू खरेदी करतात. भाविकांना स्वच्छ व चांगल्या दर्जाचा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ठेकेदाराकडून लाडू तयार करून मंदिर समिती त्याची विक्री करत होते. अलीकडेच मंदिर समितीने लाडू तयार करण्याचा ठेका रद्द करून समितीने स्वतः लाडू तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. मंदिर समितीकडून तयार केल्या जाणाऱ्या लाडू प्रसादाला आता भाविकांकडून ही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. दररोज साधारण पाच हजाराहून अधिक लाडूंची २० रुपये इतक्या अल्प दरात विक्री केली जाते.

मंदिर समितीने लाडू तयार करण्याचे काम हाती घेतल्यापासून लाडू प्रसादापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची वाढ झाली आहे. १४ एप्रिल ते २० मे दरम्यानच्या काळामध्ये मंदिर समितीने जवळपास दोन लाख ५२ हजार ९०० लाडू तयार केले. लाडू विक्रीतून सुमारे २५ लाख २९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून १५ लाख ७० हजार रुपये इतका खर्च आला आहे. खर्च वजा जाता मंदिर समितीला केवळ एका महिन्यामध्येच लाडू विक्रीतून सुमारे दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. आषाढी वारी तोंडावर आली आहे. त्यापूर्वीच आता मंदिर समितीकडून अधिकच्या लाडू प्रसाद तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

मंदिर समितीने ठेकेदारी पध्दत रद्द करून स्वतः लाडू प्रसाद तयार करून त्याची विक्री सुरू केली आहे. मागील महिन्यात मंदिर समितीला लाडू प्रसाद विक्रीतून जवळपास १० लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. भाविकांना लाडू प्रसाद स्वच्छ व दर्जेदार देण्यास समितीने प्राधान्य दिले आहे. आषाढीची तयारी सुरू केली आहे.

- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असताना पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या बहिष्काराच्या घोषणेनंतर आता 28 मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभातून काँग्रेसकडूनही बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे नेते पक्षांतर्गत चर्चा करत असून लवकरच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहितीही देण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply