Pandharpur Mhaswad Highway : उपरी पूलाला तडे; माेठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का ?

Pandharpur : पंढरपूर ते म्हसवड या 60 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. या मार्गावरील उपरी येथील पूलाला तडे गेल्याने पूल धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे रस्त्याचे काम पूर्ण होण्यापुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील दीड वर्षीपूर्वी त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

पंढरपूर तीर्थक्षेत्राला जोडणा-या सर्व मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. इतर महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र पंढरपूर ते म्हसवड या महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रडतखडत सुरू आहे.

 
गेल्या वर्षभरापासून तर काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. या मार्गावरील उपरी गावा जवळच्या कासाळ ओढ्यावरील सर्वात मोठ्या पूलाचे काम देखील रखडले आहे.

येथील जून्या पूलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा पुल अत्यंत धोकादायक झाला आहे. पूलाचे कठडे तुटून पडले आहेत. तर पूलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. पुलाचे दगडी खांब देखील पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत. अशा धोकादायक पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणावर प्रवाशी व माल वाहतूक सुरू आहे.

येथील पूलाचे व रस्त्याचे काम पूर्ण करावे यासाठी रस्ते विकास महामंडळाकडे वारंवार तक्रारी करून ही महामंडळाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याचे काम सुरू असतानाच मागील दीड वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. दीड वर्षांनंतरही या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply