Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; २४ तास घेता येणार दर्शन

Pandharpur : आषाढी एकादशीनंतर येणारी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात यात्रा भारत असते. या एकादशीला देखील भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्तिक यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठल दर्शनासाठी तीन किलोमीटर पर्यंत रांग गेली आहे. 

आषाढी यात्रेनंतर कार्तिकीला देखील यात्रा भरत असते. १२ नोव्हेंबरला पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. पंढरपुरात सध्या लाखो भाविक दाखल झाले असून विठू नामाच्या गजराने पंढरी नगरी अवघे दुमदुमून गेली आहे. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी देखील भाविकांची गर्दी होत आहे. आतापासूनच भाविक दर्शनाच्या रांगेत लागले असून भाविकांसाठी २४ तास दर्शनाची सुविधा करण्यात आलेली आहे.  

Noida Accident : नोएडा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

यंदाच्या कार्तिकी एकादशीला मोठ्या संख्येने भाविक कार्तिकीसाठी येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, चहा, नाश्ता, जेवण आधी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांना उकाड्याचा त्रास होऊ नये; यासाठी ठिकठिकाणी पंखे कुलरची व्यवस्था केलेली आहे. गोपाळपूर रोडवरील जवळपास सहा पत्र शेड भाविकांनी भरले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply