Pandharpur Flood : अलर्ट! पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून ८० हजार क्युसेकचा विसर्ग; चंद्रभागेत पाणी वाढणार, ३५ कुटुंबांचे स्थलांतर

 

Pandharpur Flood : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून राज्यातील २० हून अधिक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पंढरपूरमध्येही भीमा नदीची इशारा पातळीकडे सरकरत असून शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ३५ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पंढरपूरमध्ये भीमा नदी इशारा पातळीपासून अवघ्या चार मीटर दूर आहे. त्यामुळे पंढरपूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे, आज दुपारनंतर पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Pune News : पुणेकरांनो आरोग्याला जपा! शहरात डेंग्यू, चिकनगुनिया आणि टायफाईडचा धुमाकूळ, रुग्णसंख्या 34 वर

आज सकाळी उजनी धरणातून 80 हजार क्युसेक पाणी तर वीर धरणातून 60 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरू आहे. सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीच्या वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे.

सध्या पंढरपुरात चंद्रभागा 30 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह घेऊन वाहत आहे. दुपारनंतर हा विसर्ग वाढणार आहे. सध्या 439 मीटर पातळीने भीमा नदी आहे. इशारा पातळी 443 मीटर आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील सखल भागाला पुराचा धोका बसू शकतो. दरम्यान, या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्र

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply