Pandharpur Ashadhi Yatra : आषाढी निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर; ७ लाख भाविक दाखल

Pandharpur : आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. उद्या आषाढी एकादशी असल्याने या सोहळ्याच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. यामुळे पंढरीत अक्षरशः भक्तीचा महापूर वाहू लागला आहे. पंढरपुरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर भाविकांची मांदियाळी झालेली पाहण्यास मिळत आहे. 

आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्याची आस वारकरी व भाविकांना लागलेली असते. या आषाढी निमित्ताने भाविक पंढरपुरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शिवाय मागील महिनाभरापासून राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून पायी वारी करत निघालेल्या सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. यामुळे वारकरी व भाविकांच्या गर्दीची मांदियाळी येथे पाहण्यास मिळत आहे. उद्या आषाढी एकादशी असताना आजच्या दिवशी जवळपास ६ ते ७ लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. 

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांकडून होणार दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी

पंढरपुरात यावर्षी किमान १६ ते १७ लाख भाविक वारीसाठी येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार भाविकांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. पंढरीत विठू नामाचा जयघोष सुरू असून अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. पंढरपुरातील महाद्वार चौकात तर भाविकांच्या गर्दीचा महापूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर चंद्रभागा नदीत देखील स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहण्यास मिळत आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply