Pandharpur News: पंढरपूर भाविकांनी फुललं, तब्बल 53 कोटी 97 लाख रुपये विठुरायाच्या चरणी दान

Pandharpur : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनाला दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी असते. वठूरायाच्या चरणी भाविकांकडून सोनं, चांदीसोबतच पैसे अर्पण केले जातात. वर्षभरामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. या भाविकांनी वर्षभरामध्ये वठूरायाच्या चरणी तब्बल 53 कोटी 97 लाख रुपये दान केले आहेत. वर्षाअखेर असल्याने आणि सलग सुट्ट्या असल्यामुळे विठूरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे. पंढरपूरातील भक्तनिवास हाऊसफुल्ल झाले आहे.

गरीब आणि कष्टकऱ्यांचे दैवत अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल- रक्मिणीच्या चरणी वर्षभरात तब्बल 53 कोटी 97 लाख रूपयांचे दान जमा झाले आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांनी देवाच्या खजिन्याने प्रथमच अर्धशतक पार केले आहे. यामध्ये जवळपास 2 कोटी 72 लाख रूपये किंमतीच्या सोने-चांदीच्या दागिन्यांची भर देवाच्या खजिन्यात पडली आहे. त्यामुळे देवाचा खजिना सोने-चांदीने अधिक समृद्ध झाला आहे.

Pune Pub Party : निमंत्रण पत्रिकेसोबत कंडोम पाकिटं वाटली, पोलिसांनी पार्टीच रद्द केली, पुण्यातील 'त्या' पबवर कारवाई

गेल्या वर्षभरात विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी विक्रमी 6 कोटी 25 लाख रुपयांची देणगी देवाच्या चरणावर अर्पण केली आहे. तर देशभरातील दानशूर विठ्ठल भक्तांनी 7 कोटी 90 लाख 3 हजार रूपयांची रोख स्वरूपात देणगी दिली आहे. तर तब्बल 7 कोटी 56 लाख 74 हजारांचे दान मंदिरातील विविध ठिकाणच्या दान पेटीत जमा झाले आहे.

विठ्ठल रुक्मिणी नित्य (महापूजा) पूजेला विशेष महत्त्व असते. देवाच्या नित्य पूजेतून देखील 1 कोटी 3 लाख 72 हजार रूपयांची देणगी मंदिर समितीला मिळाली आहे. दर्शनासाठी आलेले भाविक देवाचा बुंदीलाडू प्रसाद खरेदी करतात. वर्षभरात जवळपास 7 कोटी 70 लाख 58 हजार रुपये लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला मिळाले आहेत.

भक्तनिवास, अन्नछत्र, विधी उपचार, परिवार देवता, तुळसी पूजा, पाद्य पूजा आदीच्या माध्यमातून सुमारे 14 कोटींचे उत्पन्न मंदिर समितीकडे जमा झाले आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मंदिर समितीला मिळणाऱ्या उत्पन्नात देखील मोठी वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2024 अखेर मिळालेल्या देणगीचा तपशील मंदिर समितीने दिला आहे.

 

दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. विठ्ठल दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक भाविक आजच पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांची संख्या वाढल्याने शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास लॉजेस हाऊसफुल्ल झाले आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनाची रांग दोन किलोमीटर अंतरावर गेली आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply