Pandharpur : कार्तिकी यात्रा सुरू असतानाच शहरात मेगा स्वच्छता मोहीम; एका दिवसात 125 टन कचरा उचलला

Pandharpur : कार्तिकी यात्रा  सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घालून दिलेल्या आषाढी पॅटर्न प्रमाणे यंदा कार्तिकीलाही एकादशीच्या रात्री पासून सफाई मोहिमेला सुरुवात झाली.  शुक्रवार, सायंकाळपर्यंत 125 टन कचरा उचलण्यात आला आहे. यात्रा कालावधीत लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे शहराला कचराकुंडीचे स्वरूप येत असते आणि यातूनच मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांचे थैमान सुरु होते. हे बदलण्यासाठी आषाढी यात्रेला मुख्यमंत्र्यांनी सफाईसाठी एक पॅटर्न घालून दिला आणि याच पद्धतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कार्तिकीलाही याची अंमलबजावणी सुरू केली. त्याच्या परिणामी आज द्वादशीला शहरातील तब्बल 125 टन कचरा हटविण्यात आला आहे . 

सोलापूर जिल्ह्यातील सर्व 13 नगरपालिका मुख्याधिकारी आणि त्यांचे सफाई कर्मचारी, यात्रेसाठी रुजू करण्यात आलेले हंगामी कर्मचारी आणि मंदिर समितीच्या कंत्राटदारांचे असे एकूण दोन हजार सफाई कर्मचारी एकादशीच्या रात्रीपासूनच कामाला लागले होते. त्यामुळे शहरातील कचरा, अस्वच्छता मोठ्या प्रमाणात साफ होण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही भाविकांचा निवास असणारे 65 एकरांवरील भक्तिसागर, चंद्रभागा वाळवंट आणि मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक असल्याने या भागात रात्री सफाई काम होत आहेत. ज्या ठिकाणचे भाविक गेले आहेत त्या ठिकाणी सफाई केली जात आहे. 

OBC Sabha : विजय वडेट्टीवार हिंगोलीच्या ओबीसी सभेला उपस्थित राहणार, कारणही सांगितले; म्हणाले...

दोन दिवसात संपूर्ण शहर स्वच्छ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्याने आता उद्या संध्याकाळीपर्यंत शहर चकाचक होऊन जाणार आहे. सध्या शहरासह, 65 एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर येथे सफाईचे काम केले जात आहे.  या भागात सफाई करताना जंतुनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत  तसेच 41 घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम अहोरात्र चालू आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील चार टिपर, दोन कॉम्पॅक्टर, एक डंपरप्लेसर, चार डंपिंग ट्रॉलिने आणि जेसीबीच्या सहाय्याने कचरा उचलला जात आहे. सफाई होताच त्याठिकाणी फवारणी देखील करण्यात येत आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply