Pandhapur : काॅंग्रेस, शिंदे गट विरोधात धनगर समाज आक्रमक; भंडारा उधळून केला निषेध

Pandharpur : पंढरपुरात धनगर समाज काॅंग्रेस आणि शिंदे गटा विरोधात आक्रमक झाला आहे. राज्यात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने एक देखील उमेदवार दिला नाही. याचा निषेध म्हणून काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक मतदार संघातून उमेदवार निश्चित केला जात आहे. अर्थात प्रत्येक भागातील राजकीय समीकरण पाहून हि उमेदवारी दिली जात आहे. मात्र धनगर समाजाचा एक देखील उमेदवार देण्यात आलेला नाही. या विरोधात समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान पंढरपुरातील प्रसिद्ध होळकर वाड्यात धनगर समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये भंडारा उधळून काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याची शपथ घेतली.

Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

राज्यात दोन कोटी धनगर समाज आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचा इशारा  धनगर समाजाचे नेते माऊली हळणवर यांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply