Palghar Politics : शिवसेनेचा राज ठाकरेंना धक्का; जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या गटात प्रवेश

Palghar Politics : पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे, जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह अनेक प्रमुख अधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आज (९ जानेवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात टेंभी नाका येथे पक्षांतर केले.

आज ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात मनसेच्या पालघर जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव यांच्यासह ३० ते ३२ मुख्य अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षात पदाधिकाऱ्यांना पाठबळ मिळत नसल्याचा आरोप समीर मोरे यांनी केला. शिंदे यांच्या कार्याला प्रभावित होऊन कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे त्यांनी म्हटले.

Mumbai Crime : मुंबईत आईनेच पोटच्या मुलाचा गळा आवळला, धक्कादायक कारण आलं समोर

विधानसभा निवडणुकांनंतर मनसे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर लक्ष देत नसल्याचे समीर मोरे यांनी सांगितले. यावरुन अविनाश जाधव आणि समीर मोरे यांच्यात अंतर्गत वाद सुरु होते. ही खदखद मोरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे मांडली. पक्षश्रेष्ठी या अंतर्गत वादावर निर्णय घेत नसल्याने मनसेमधून शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय समीर मोरे यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मनसेला मोठे खिंडार पडले आहे. तर शिवसेनेला जिल्ह्यात अधिक बळकटी मिळणार आहे.

परवा (७ जानेवारी) राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत विधानसभा निवडणुकीत जे झालं ते विसरा, मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा असे त्यांनी म्हटले होते. पालिका निवडुकांपूर्वी पक्षात बदल करण्याचा निर्धार त्यांनी बोलवून दाखवला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply