Palghar : ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला; पंचायत समिती उपसभापतींवर हल्ला, झेडपी सदस्यांवर गुन्हा दाखल

Palghar : जलजीवन मिशनच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारीनंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या डहाणूच्या ठाकरे गटाच्या पंचायत समिती उपसभापतींवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. याबाबत पिंटू गहला यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदवली आहे. 

डहाणू पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला आज अधिकाऱ्यांसह जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी करण्यासाठी डहाणूतील विरे या गावात गेले. मात्र त्यांच्यावर अचानक काही जणांनी हल्ला चढवला.

या हल्ल्यात पिंटू गहला यांना जबर दुखापत झाली. त्यांच्यावर डहाणूतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा हल्ला उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा यांनी करवल्याचं पोलीस जबाबात पिंटू गहला यांनी सांगितले.

पाेलिसांनी गहला यांच्या तक्रारीवरुन जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा यांच्यासह काही जणांवर गर्दी जमवून मारहाण केल्या प्रकरणी वानगाव पोलीस ठाण्यात (कलम 143,147,323,324.109.504.505) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.

दरम्यान या घटनेमुळे पालघर मधील ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply