Palghar News : रुग्णालयातील स्लॅब थेट प्रसुती वार्डमधील बेडवर कोसळला; पालघरमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

Palghar News : पालघरमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रसुती वॉर्डमधील स्लॅब कोसळलं आहे. प्रसुती वार्डमधील बेडवरच हे स्लॅब कोसळल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, डहाणू उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रसुतीवॉर्डमध्ये ही घटना घडली आहे. इमारतीच्या स्लॅबचा काही भाग थेट प्रसुती वार्डमधील बेडवर कोसळला. मात्र स्लॅबचा काही भाग ज्या बेडवर पडला तिथे कुठलीही स्तंनदा माता किंवा गर्भवती महिला नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, "वंचित बहुजन आघाडीशिवाय..."

मात्र सदर घटनेनंतर वॉर्डमध्ये असलेल्या स्तनदा माता आणि गर्भवती महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात रुग्णालयांच्या दुरुस्तीच्या नावाखाली लाखो करोडोचा निधी मंजूर केला जातो. मात्र रुग्णालयाच्या दुरुस्तीबाबत प्रशासन बेजबाबदारांना बाळगत असल्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या रुग्णालयांच्या दुरुस्तीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसून येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply