
Pakistani family in India : ठाण्यातील उल्हासनगरमधून पोलिसांनी नुकतीच एका बांगलादेशी ॲडल्टस्टारला अटक केली. रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख असे या महिलेचे नाव होते. त्यानंतर आता बंगळुरूमधूनही एका पाकिस्तानी कुटुंबाला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार पोलिसांनी रविवारी रशिद अली सद्दिकी (४८), त्याची पत्नी आयेशा (३८) आणि त्याचे सासू-सासरे हनीफ मोहम्मद (७३), रुबिना (६१) यांना राजपुरा गावातून अटक केली. या कुटुबांने अनुक्रमे शंकर शर्मा, आशा रानी, राम बाबू शर्मा आणि रानी शर्मा अशी नावे धारण केली.
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीनंतर बंगळुरू पोलिसांनी ही कारवाई केली. ढाकाहून दोन पाकिस्तानी नागरिक चेन्नई विमानतळावर उतरले होते. यावेळी विमानतळ अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर चौकशी केली असता त्यांचे पारपत्र बोगस असल्याचे कळले. चौकशीदरम्यान ते सिद्दिकीशी संबंधित असल्याचे समजले.
|
Pune : हडपसर भागात टोळक्याकडून वाहनाची तोडफोड, शहरात दहशत माजविण्याचे सत्र कायम |
रविवारी पोलीस जेव्हा सिद्दिकीला अटक करण्यासाठी घरी पोहोचले, तेव्हा सिद्दिकी आणि कुटुंबिय बॅग भरून स्थळ बदलण्याच्या तयारीत होते. सिद्दिकीची चौकशी केल्यानंतर ते २०१८ पासून बंगळुरूमध्ये राहत असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्यांच्या पारपत्र आणि आधार कार्डवरही हिंदू नावे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शर्मा असे नाव बदलून राहत असले तरी त्यांच्या घरातील भिंतीवर “मेहदी फाऊंडेशन इंटरनॅशनल जश्न-ए-युनूस”, असे लिहिलेले होते. तसेच भिंतीवर काही मौलवींचे फोटो होते.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सिद्दिकी उर्फ शंकर शर्मा याने पाकिस्तानी असल्याचे कबू केले. तो स्वतः कराचीजवळील लियाकताबाद येथे राहणारा आहे. तर त्याचे कुटुंबीय लाहोर येथे राहत होते. सिद्दिकीने सांगितले की, २०११ साली त्याने आयेशाबरोबर ऑनलाईन लग्न केले होते. तेव्हा आयेशा तिच्या पालकांसह बांगलादेशमध्ये राहत होती. पाकिस्तानमध्ये मेहदी फाऊंडेशनचे धार्मिक कार्य करत असल्यामुळे सिद्दिकीला देशाबाहेर काढण्यात आले होते.
बंगळुरूमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सिद्दिकी बांगलादेशमध्ये गेला आणि तिथे त्याने मेहदी फाऊंडेशनच्या खर्चावर पुन्हा धर्मप्रसार सुरू केला. मात्र २०१४ साली बांगलादेशमधून त्याला विरोध झाला. त्यामुळे त्याने भारतातील मेहदी फाऊंडेशनचे काम करणाऱ्या परवेज नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधून सिद्दिकी भारतात आला. पश्चिम बंगालच्या मालदा येथून एका एजंटच्या मदतीने सिद्दिकी आणि त्याची पत्नी, सासू-सासरे, नातेवाईक झैनबी नूर आणि मोहम्मद यासीन हे अवैधरित्या भारतात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दिकी भारतात आल्यानंतर ते सुरुवातीला काही दिवस दिल्लीत राहिले. त्यानंतर त्यांनी शर्मा नावाने बोगस पारपत्र, आधार कार्ड आणि वाहन चालक परवाना तयार केला. दिल्लीमध्ये मेहदी फाऊंडेशनच्या प्रचाराचे काम या काळात सिद्दिकीने केली.
२०१८ साली वसीम आणि अल्ताफ यांची नेपाळमध्ये भेट झाल्यानंतर सिद्दिकीने बंगळुरूमध्ये स्थायिक होऊन तिथेच धर्मप्रचार करण्याचा निर्णय घेतला. अल्ताफने सिद्दिकीच्या राहण्याची व्यवस्था केली. सिद्दिकीच्या सासू सासऱ्याने बंगळुरू येथे बँक खातेही उघडले होते. सिद्दिकी धर्मकार्याबरबोरच गॅरेजेसना इंधन पुरविणे आणि खाद्यपदार्थ विक्रीचे काम करत होता. पोलिसांनी विविध कलमांखाली सिद्दिकी आणि त्याच्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel
