Pakistani Airstrikes In Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर Air strike, १५ जणांचा मृत्यू, तालिबान देणार प्रतिउत्तर

Pakistani Airstrikes: पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानवर एअर स्टाईक केला आहे. मंगळवारी (२४ डिसेंबर) रात्री अफगाणिस्तानच्या सीमेजवळील पक्तिका प्रांतातील बारमल जिह्यांमध्ये हवाई हल्ला झाला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश आहे. मृतांची संख्या वाढत असल्याचेही म्हटले जात आहे.

अफगाणिस्तानच्या लमन गावासह अन्य सात गावांना हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आले होते. हल्ल्यात लमनमधील एकाच कुटुंबातील पाच सदस्य मृत्यूमुखी पडले आहेत. याशिवाय बारमलमधील मुर्ग बाजार गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हा प्राणघाती हल्ला पाकिस्तान हवाई दलाकडून करण्यात आल्याचा दावा स्थानिक सूत्रांनी केला आहे.

खामा प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रात्री झालेल्या हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली आहे. या प्रदेशामध्ये तणाव वाढत आहे. शासनाद्वारे पीडितांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय हल्ल्याच्या तपशीलांची पृष्टी करण्याच्या दृष्टीने तपास होणार आहे. तथ्यांची पूर्तता झाल्यानंतर हल्ला कोणी केला हे स्पष्ट होईल.

Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, २ दिवस पाणी पुरवठा बंद; कोणत्या भागांचा समावेश?

दरम्यान हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे विधान तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने केले आहे. वझिरीस्तानी निर्वासितांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला ख्वाराझमी यांच्या पोस्टनुसार, या हल्ल्यात १५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात स्थानिकांसह वझिरीस्तानच्या निर्वासितांचा समावेश आहे. शोधमोहीम सुरु असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानने सध्यातरी या हवाई हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हा हल्ला प्रामुख्याने पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेजवळील तालिबानच्या छुप्या ठिकाणांवर होता असे म्हटले जात आहे. पाकिस्तानी सैन्यावर मागील काही महिन्यात 'पाकिस्तानी तालिबान म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)'ने हल्ले वाढवले आहेत. अफगाणिस्तान या अतिरेक्यांना आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता.

अफगाणिस्तानमधील टीटीपीच्या अतिरेक्यांची संख्या वाढत असल्याचा दावा पाकिस्तान करत असताना अफगाणिस्तान तालिबानने याला ठामपणे नकार दिला आहे. याशिवाय वझिरीस्तान हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वादाच्या मुद्द्यांपैकी एक आहे. पाकिस्तानमधील आदिवासी भागात लष्करी कारवायांना कंटाळून अफगाणिस्तानमध्ये वझिरीस्तानमध्ये निर्वासित म्हणून वास्तव्य करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply