T20 WC Pakistan Scenarios : पाकिस्तान संघ थाटात मारणार सुपर-8 मध्ये एंन्ट्री, पण कशी? जाणून घ्या 'ग्रुप A'चे समीकरण

Pakistan Qualification Scenarios T20 World Cup 2024 : अमेरिकन संघाकडून धक्कादायक पराभवा अन् भारताकडून क्लेशदायक मात पत्करावी लागल्यानंतर पाकिस्तानच्या टी-२० विश्वकरंडकातील सुपर आठ फेरीमध्ये पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला आहे.याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा संघ आज अ गटातील साखळी फेरीच्या लढतीत कॅनडा संघाचा सामना करणार आहे. पाकिस्तानला उर्वरित दोन्ही लढतींमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागणार असून अमेरिका वा भारत या देशांच्या लढतींच्या निकालांवरही त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.

पाकिस्तानी संघात दोन गट पडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे. कर्णधार बाबर आझम, त्याचा जवळचा मित्र मोहम्मद रिझवान, शादाब खान हे एका गटात असून शाहीन शाह आफ्रिदी याचा एक गट तयार झाला आहे. याच कारणामुळे पहिल्या दोन्ही लढतींमध्ये पाकिस्तान संघासाठी काहीच जुळून आले नाही. पाकिस्तानी फलंदाजांचे अपयश बोचणी देणारे ठरत आहे. फखर जमान, इमाद वासीम, शादाब खान व इफ्तिकार अहमद यांच्या बॅटमधून धावाच निघालेल्या नाहीत.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा होणार IND Vs PAK सामना? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

 

भारताविरुद्धच्या लढतीत नसीम शाह व मोहम्मद आमीर या वेगवान गोलंदाजानी ठसा उमटवला. ही पाकिस्तानसाठी आनंदाची बाब ठरली, पण उर्वरित लढतींमध्ये शाहीन शाह आफ्रिदीला सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. अमेरिकन संघाविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कॅनडाने आयर्लंडवर मात करीत टी-२० विश्वकरंडकातील आपले आव्हान कायम ठेवले. आता आत्मविश्वास तळाला गेलेल्या पाकिस्तानशी त्यांना लढत खेळावी लागणार आहे. पाकिस्तानचा संघ कॅनडाला कमी लेखणार नाही, एवढे मात्र निश्चित आहे.
अ गटातील समीकरण

- पाकिस्तानी संघाला 'सुपर आठ' फेरीत पोहोचण्यासाठी कॅनडा व आयर्लंड या दोन देशांविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक असणार आहे.

पाकिस्तानी संघाला अमेरिका, भारत या देशांच्या लढतींच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

भारत व आयर्लंडने अमेरिकेला पराभूत केल्यास पाकिस्तानकडे पुढल्या फेरीत पोहोचण्याची संधी असेल.

• - पाकिस्तान व आयलंड या दोन्ही देशांनी दोन विजय मिळवले, तर नेट रनरेट ज्या संघाचा चांगला असेल, तोच संघ आगेकूच करेल.

भारताचा संघ अ गटात चार गुणांसह पहिल्या, तर अमेरिकन संघ चार गुणांसह दुसन्या स्थानावर आहे याच दोन संघांना पुढल्या फेरीत पोहोचण्याची संधी अधिक आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply