Pakistan Airline Issue: पाकिस्तानात जबरदस्त तंगी! इंधन नसल्यानं राष्ट्रीय एअरलाईनची ४८ उड्डाण रद्द

Pakistan Airline Issue : पाकिस्तानची राष्ट्रीय एअरलाईन कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सला (PIA)आपल्या विमानांची ४८ उड्डाण रद्द करावी लागली आहेत. यामध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांचा समावेश आहे. इंधनाची कमतरता असल्यानं विमान कंपनीवर ही नामुष्की ओढवली आहे.

अनेक उड्डाण रिशेड्युल

पीआयएच्या प्रवक्त्यानं पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनशी बोलताना सांगितलं की, "मर्यादीत इंधन पुरवठ्यामुळं विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यामुळं दररोजच्या उड्डाणांवर तसेच ऑपरेशनल अडचणी निर्माण झाल्या. अनेक उड्डाणं रिशेड्युल करण्यात आली आहेत. यामध्ये १३ डोमेस्टिक आणि ११ इंटरनॅशनल फ्लाइट्सचा समावेश आहे, तर इतर १२ फ्लाइट्सना उशीर झाला आहे

Lalit Patil Arrested : मोठी बातमी! ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला चेन्नईमधून अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

किती आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द?

\रद्द झालेल्या उड्डाणातील प्रवाशांची पर्यायी विमानांमध्ये सोय करण्यात आली आहे. कंपनीनं या प्रवाशांना पीआयएच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारी (आज) पीआयएनं डझनहून अधिक यामध्ये १६ आंतरराष्ट्रीय आणि ८ डोमेस्टिक फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत तर इतर फ्लाइट्सना उशीर होणार आहे. 

इंधनाची कमतरता का?

थकबाकीची पू्र्तता न झाल्यानं पाकिस्तानच्या राष्ट्रीय ऑइल कंपनीनं (PSO) 'पीआयए'चा इंधन पुरवठा रोखला आहे. सध्या पीआयए ही अनेक अडचणींचा सामना करत असून मोठ्या कर्जाच्या डोंगरामुळं ही कंपनी खासगीकरणाच्या वाटेवर आहे. पाकिस्तानच्या सरकारनं आपल्याच राष्ट्रीय विमान कंपनीला २३ बिलियन रुपयांची आर्थिक मदत देण्यास नकार दिला आहे.

पीआयएला दिवसाला १०० मिलियन रुपये इंधनापोटी खर्च येतो. यापुढे कंपनीला इंधनाचा पुरवठा सुरु करायचा असेल तर केवळ अॅडव्हान्स कॅश पेमेंट करण्यास सांगण्यात आलं आहे. पण विमान कंपनी ही मागणी पूर्ण करु शकत नसल्यामुळं भविष्यात देखील कंपनीची अनेक उड्डाण रद्द होण्याची शक्यता आहे.

इंधनाच्या वाढत्या किंमती

सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलच्या किंमती ३०० रुपये प्रतिलिटर इतकी झाली होती. पाकिस्तानात इतिहासात पहिल्यांदाच इंधनाच्या किंमती इतक्या प्रचंड प्रमाणावर भडकल्या आहेत. त्यातच पाकिस्तानच्या सध्याच्या काळजीवाहू सरकारनं गुरुवारी पेट्रोलचे दर १४.९१ रुपयांनी तर डिझेल १८.४४ रुपयांनी वाढवले. यामुळं सध्या पेट्रोलचा दर ३०६.३६ रुपये तर डिझेलचा दर ३११.८४ रुपयांवर पोहोचला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply