टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली. हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. हा सामना पाकिस्तानला काहीही करून 64 धावांनी जिंकायचा आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्याचं आव्हान होतं. त्या दृष्टीने पाकिस्तानी फलंदाजांनी सुरुवात केली. पाकिस्तानने 20 षटकात 8 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी चांगली सुरुवात केली. तसेच पाकिस्तानला 200 पार धावा करण्यास मदत केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी केली. यात साहिबजादा फरहानची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. साहिबजादा फरहानने 59 चेंडूत शतक ठोकलं. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 166 पेक्षा जास्त होता.ट साहिबजादा फरहानने या शतकासह एक विक्रम रचला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एकाच पर्वात दोन शतकं ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने एकाच पर्वात दोन शतकं ठोकली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानचं नाव येतं. पाकिस्तानकडून एकाच पर्वात दोन शतकं ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 3 शतकं ठोकली आहेत. आता या विक्रमापासून साहिबजादा फरहान एक विकेट दूर आहे. साहिबजादा फरहानने आपले शतक पूर्ण केले आणि 12 वर्षांपूर्वी भारतीय दिग्गज विराट कोहलीने बनवलेला विक्रम मोडला. साहिबजादा फरहानने एका टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पर्वात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने यासह विराट कोहलीला मागे टाकलं आहे. कोहलीने 12 वर्षापूर्वी 2014 मध्ये सहा डावात 319 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम साहिबजादा फरहानच्या नावावर झाला आहे. श्रीलंकेला 147 धावांवर रोखण्याचं आव्हान पाकिस्तानवर असणार आहे. कारण तसं झालं तरच पाकिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे या सामन्यात काय होतं? याची उत्सुकता आहे. श्रीलंकेने 148 धावा केल्या तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


