Pahalgam Attack : अमेरिकेचा भारताला जाहीर पाठिंबा, ट्रम्प म्हणाले 'दशतवादाविरोधात कारवाई करावी'

Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने भारताला हादरवून टाकले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. महत्वाचे म्हणजे या हल्ल्यानंतर भारताला जगातील अनेक शक्तिशाली देशांकडून पाठिंबा मिळाला आहे. या सर्वांनी एकमताने भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला पाठिंबा जाहीर केला आहे. या देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे.

अमेरिकेने दहशतवादाविरोधाच्या लढाईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. अमेरिकेने नुकताच याबाबत एक निवेदन जारी केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींशी आधीच फोनवर चर्चा देखील केली आहे. अमेरिकेने भारताला पाठिंबा दिल्याबाबतची महत्वाची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिली. यापूर्वी अमेरिकेने या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान दोघांशीही चर्चा केली होती. ब्रूस म्हणाले की, 'हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांच्या सरकारांशी सतत संपर्कात आहे.'

टॅमी ब्रूस यांनी सांगितले की, 'आम्ही सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. परराष्ट्र सचिवांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले होते की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये अमेरिका भारतासोबत ठामपणे उभा आहे आणि पंतप्रधान मोदींना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.'

त्यांनी असे देखील सांगितले की, 'अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या सचिवांनी दोन्ही देशांना ही समस्या जबाबदारीने सोडवण्यासाठी काम करण्यास सांगितले आहे. जेणेकरून दक्षिण आशियात दीर्घकालीन शांतता आणि प्रादेशिक स्थिरता राखता येईल. आम्ही दोन्ही देशांच्या सरकारांशी वेगवेगळ्या टप्प्यांवर संपर्कात आहोत. आम्ही दोन्ही देशांकडून योग्य तो तोडगा काढत आहोत.'

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply