Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात

Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या आहेत. देशातील मृत पावलेल्या २७ जणांपैकी महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. भारताचं 'नंदनवन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये महाराष्ट्रातूनही २००० हजारांहून अधिक पर्यटक गेले होते. त्यात पुण्यातीलही एका नवदाम्पत्याचा समावेश आहे. पुण्यातील नवदाम्पत्य महाराष्ट्रातील पर्यटकांना मदतीचा हात देत आहेत.

पुण्यातील जोडपे धनंजय जाधव आणि पूजा मोरे जाधव हे लग्नानंतर काश्मीरला फिरायला गेले होते. पुण्यातील जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरला पोहोचल्यानंतर पहलगाममध्ये दहशतादी हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्याने महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.

Pahalgam Attack : आमच्या नावाखाली दहशतवाद नको; नागरिकांचा दहशतवाद्यांना इशारा; हल्ल्याच्या निषेधार्थ बंद..

पुण्यातील नवदाम्पत्याने सांगितलं की, 'लग्नानंतर फिरण्यासाठी आम्ही पती-पत्नी काल श्रीनगर येथे दाखल झालो. त्याचवेळी पहलगाममध्ये हल्ला झाला. दहशत कळताच महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत म्हणून आम्ही महाराष्ट्रातील एका आर्मी ऑफिसरच्या मदतीने 15 Corps med headquarter, Shrinagar येथील आर्मी कॉन्टोन्मेंटचा पास काढला. त्यानंतर कालपासून याच ठिकाणी आहोत'.

'देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील कालपासून कॉन्टोन्मेंट मीटिंगसाठी आले होते. शहिद पर्यटकांच्या काही शव पेट्या याच ठिकाणी आणल्या जात आहेत. तसेच घायाळ झालेल्या पर्यटकांवर याच ठिकाणी आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आम्हाला महाराष्ट्रातील पर्यटकांना हेच सांगायचं आहे. आपण एकमेकांना या परिस्थितीत साथ देऊ. या आम्ही या ठिकाणी पुढील 5 दिवस आहोत. महाराष्ट्रातील पर्यटकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काही मदत लागल्यास व्हाट्सअॅप नंबरवर आम्हाला संपर्क करा. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आर्मी आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्या संपर्कात आहोत, असे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply