Scientist Dead : खळबळजनक! पद्मश्री सायंटिस्टचा मृतदेह कावेरी नदीत आढळला, ३ दिवसापासून होते बेपत्ता

Scientist Dead : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रख्यात वैज्ञानिक सुब्बन्ना अय्यप्पन (वय ७०) यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळला आहे. ७ मे २०२५ पासून ते अचानक बेपत्ता झाले होते. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला होता. शनिवारी (१० मे २०२५) रात्री त्यांचा मृतदेह कावेरी नदीत सापडला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, अय्यप्पन यांची हत्या झाली की आत्महत्या केली, याचा तपास सुरू आहे. अय्यप यांचा मृतदेह आढळल्यानंतर कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

वैज्ञानिक सुब्बन्ना अय्यप्पन यांचे यांचे संशयास्पद परिस्थितीत निधन झाले आहे. शनिवारी त्यांचा मृतदेह कावेरी नदीजवळ श्रीरंगपट्टणा, मंड्या येथे आढळला. स्थानिकांनी नदीत एक मृतदेह तरंगताना आढळला होता. त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळावर जात मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अय्यपन यांचा मृतदेह आढळल्यानंतर कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मांड्याचे एसपी मल्लिकार्जुन बालदंडी यांनी सांगितले की, अय्यप्पन यांची स्कूटर नदीजवळ आढळली. परंतु प्राथमिक तपासात कोणत्याही षडयंत्राचा अथवा हत्येचा पुरावा मिळालेला नाही. तपास सुरू आहे.

Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी

अय्यपन ७ मेपासून बेपत्ता होते. ८ मे रोजी म्हैसूर येथील विद्यारण्यपुरम पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. पण शनिवारी ते मृत अवस्थेत आढळले. अय्यपन यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली आहेत.

पोलिस आयुक्त सीमा लाटकर यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अय्यप्पन यांची शेवटची लोकेशन श्रीरंगपट्टणामध्ये आढळली होती. त्यांना ध्यानधारणेत आवड होती, आणि ते स्कूटरवरून तिकडे गेले होते. सुब्बन्ना अय्यप्पन हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) माजी महासंचालक होते आणि कृषी व मत्स्यपालन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी २०१० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply