One Nation, One Election : 'एक देश, एक निवडणूक'साठी हालचालींना वेग; समितीची दिल्लीत आज पहिली बैठक

One Nation, One Election : 'एक देश, एक निवडणूक'साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक आज (शनिवारी 23 सप्टेंबर) पार पडणार आहे. आज सकाळी 11 वाजता दिल्लीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे.

दरम्यान 'एक देश, एक निवडणूक' बैठकीमध्ये पुढील कामाचा आरखडा कसा तयार करायचा याबाबत चर्चा पार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बैठकीला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल, कायदा सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित असणार आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ओडिसामध्ये बोलताना म्हटलं होतं की, '23 सप्टेंबर रोजी 'एक देश, एक निवडणूक' समितीची बैठक पार पडणार आहे.

IPS Vijay Raman Passed Away : निवृत्त आयपीएस अधिकारी विजय रमण यांचे निधन

समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदयां च्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी रोड मॅप संदर्भात होणार चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. 2 सप्टेंबरला सरकारने 'एक देश, एक निवडणूक' संदर्भात समिती गठीत केली होती .

'एक देश, एक निवडणूक' समितीत कोण?

वन नेशन, वन इलेक्शन समितीची अधिसूचना केंद्र सरकारनं जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे असतील. तसेच गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एन के सिंह, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे, संजय कोठारी यांचाही या समितीत समावेश आहे.

समिती नेमकं काय करणार?

समिती 'वन नेशन, वन इलेक्शन' अर्थात देशभरातील सर्व निवडणुका जसं लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समिती आदी निवडणुका एकाच वेळी घेता येणं शक्य आहे का? याचा अभ्यास आणि पडताळणी करणार आहे. यासाठी ही समिती देशातील सर्व राज्यांचा दौरा करुन याबाबत लोकजागृती तसेच लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. तसेच विविध राजकीय पक्षांशी देखील ही समिती सल्लामसलत करणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply