Odisha Train Accident : बालासोर अपघातानंतर 51 तासांनी वाहतूक पूर्ववत; दुर्घटनास्थळावरुन धावली वंदे भारत एक्स्प्रेस

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातानंतर 51 तासांनंतर सोमवारपासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. या मार्गावरुन आज हावडा-पुरी वंदे भारत एक्स्प्रेसही धावली गेली. परंतु अतिवेगाने धावणारी वंदे भारत ट्रेन आज अपघात स्थळावरुन मुंगीच्या वेगाने जाताना दिसली.

बालासोर येथील अपघातानंतर बचावकार्यासोबत रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्याचं मोठं आव्हान रेल्वेसमोर होतं. 51 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे मार्गातील सर्व रेल्वेचे डबे हटवून मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली. 

आज या मार्गावरुन हावडा पुरी वंदे भारत एक्सप्रेस धावली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक्सप्रेस अत्यंत कमी वेगाने या ठिकाणी वंदे भारत ट्रेन धावताना दिसली, असं सहसा दिसत नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, भीषण अपघातानंतर 51 तासांनंतर रविवारी रात्री 10.40 वाजता ओडिशाच्या बालासोर येथील अपघातग्रस्त विभागातून पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवी झेंडा दाखवून रवाना केले.

मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती आणि त्याच ट्रॅकवरून धावत होती जिथे शुक्रवारी रेल्वे अपघात झाला. अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, 'खराब झालेली डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत झाली आहे. सेक्शनमधून पहिली ट्रेन निघाली.

हावडा ते पुरीला जोडणारी पहिली वंदे भारत ट्रेन

18 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील पहिल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला होता. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा ते पुरीला जोडते. पुरी-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन आहे, जी सुमारे साडेसहा तासांत 500 किलोमीटरचे अंतर कापते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply