OBC and EWS Girls Education Fees : ओबीसी आणि EWS मधील मुलींची संपूर्ण फी सरकार भरणार, मराठा उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

OBC and EWS Girls Education Fees : महाराष्ट्र सरकार राज्यातील शेड्युल कास्टमधील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरत आहे. अशातच आता ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील मुलींची सर्व अभ्यासक्रमांची संपूर्ण फी सरकार भरणार असल्याचा महत्त्वूर्ण ठराव आरक्षण आणि तर सुविधांबाबत झालेल्या सरकारच्या मराठा उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. आठ लाखांपेक्षा कमी वर्षीक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ घेता येणार आहे.

मराठा आरक्षण उप समितीच्या झालेल्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला असून लवकरच तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यातील  ओबीसी आणि EWS इडब्ल्यूएसमधील लाखो मुलींना याचा लाभ होणार आहे सध्या सरकार ओबीसीतील विद्यार्थ्यांची निम्मी फी भरते.

Prakash Ambedkar : मनोज जरांगेंना आव्हान देण्याची काय गरज होती ? प्रकाश आंबेडकरांची भुजबळांवर टीका

शिवाय मागील तीन वर्षांपासून शुल्क प्रतिपूर्ती परतफेड करण्याबाबत येत्या अधिवेशनात प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याची माहिती मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील एका मुलीकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे प्रकरण पुढे आले. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत ओबीसी आणि ई डब्ल्यू एस प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमांच्या संपूर्ण फीबाबत निर्णय घेण्यास पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानंतर काल झालेल्या उपसमितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हा ठराव मंत्रिमंडळात मंजुरीकडे पाठवला नंतर 642 कोर्सेसाठी १ हजार कोटीची नव्याने तर्तूद करावी लागणार असल्याचे देखील समजले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply