NZ vs PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला,न्यूझीलंड विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, कोलंबोत किती धावा करणार?

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 41 व्या आणि सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 33 मिनिटांनी टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन सलमान आघा याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.

दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

पाकिस्तानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. तर न्यूझीलंडने तब्बल 3 बदल केले आहेत. पाकिस्तानच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये फखर झमान याचा समावेश करण्यात आला आहे. तर ख्वाजा नफे याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर न्यूझीलंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये लॉकी फर्ग्यूसन आणि इश सोढी या दोघांचं कमबॅक झालं आहे.

पाकिस्तान-न्यूझीलंडचा 50 वा टी 20i सामना

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा 50 वा टी 20i सामना असणार आहे. याआधी उभयसंघात 49 सामने खेळवण्यात आले आहेत. या 49 पैकी सर्वाधिक सामन्यांत काही अंशी पाकिस्तान न्यूझीलंडवर वरचढ आहे. पाकिस्तानने 24 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 23 सामन्यांत यश मिळवलं आहे. तर उभयसंघातील 2 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

कोलंबोतील आकडेवारी काय सांगते?

टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या 5 पैकी 4 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर फक्त एका सामन्यातच धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

पाकिस्तान न्यूझीलंडवर वरचढ

दरम्यान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान न्यूझीलंडवर वरचढ आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडवर 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने पाकिस्तानवर 2 सामने जिंकले आहेत.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम सायफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचीन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिशेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), जेम्स नीशम, मॅट हेन्री, ईश सोधी आणि लॉकी फर्ग्युसन.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साहिबजादा फरहान, सॅम अय्युब, सलमान आघा (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, उस्मान खान (विकेटकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, सलमान मिर्झा आणि उस्मान तारिक.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *