Nylon Manja : नाशकात 3 लाख 78 हजारांचा नायलॉन मांजा जप्त,14 गुन्हे दाखल;18 विक्रेत्यांना अटक

Nylon Manja : नायलाॅन मांजा  विक्री करणा-यांवर आणि वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नुकतेच दिलेत. त्यानूसार नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी २१ भरारी पथकांची नियुक्त केली. या पथकाने गत २० दिवसांत १४ गुन्हे दाखल करीत १८ विक्रेत्यांना अटक केली. तसेच ४१ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती दिली. 

नायलॉन मांजामुळे माेठ्या दुर्घटना घडल्या आहेत आणि घडताहेत. त्यामुळे या मांज्यावर काही ठिकाणी बंदी आणली गेली आहे. मुंबई उच्चन्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देखील नायलाॅन माजांचा वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन विक्रेत्यांचे दुकान तसेच घर सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात नायलाॅन मांजा वापरणा-यांवर देखील जरब बसल्याचे दिसून आले.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा कंट्रोल रुमला फोन, मुंबई पोलीस सतर्क

नायलॉन मांजामुळे पक्षांसह नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होत असल्यानं नाशिक पोलिसांकडून कडक पावलं उचलली गेली आहेत. नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी पोलिसांची २१ भरारी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे.

नायलॉन मांजा विक्री आणि वापर प्रकरणी मागील २० दिवसांत १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १८ विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून ४१ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती पाेलिस दलाने दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply