Nylon Manja : नायलॉन मांजावर नाशिकमध्ये बंदी; थेट गुन्हा, हद्दपार, तडीपारीची कारवाई

Nylon Manja :  येत्या संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्यासाठी तुम्ही नाशिकमध्ये नायलॉन मांजाचा वापर कराल तर सावधान. कारण नाशिक पोलिसांनी २३ जानेवारीपर्यंत  नाशिकमध्ये नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातली असून नायलॉन मांजा वापरल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय.

मकरसंक्रांत जवळ आली असल्याने आता पतंग उडविण्यास सुरवात झाली आहे. याकरिता नायलॉन मांजाचा वापर केला जात असतो. मकरसंक्रांतीच्या काळात नायलॉन मांजाच्या वापरामुळे माणसांना, प्राणी, पक्षांना इजा होते. तसेच अपघाताच्या देखील अनेक घटना घडत असल्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात नायलॉन मांजाच्या वापरावर मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार २३ जानेवारीपर्यंत नाशिक शहरात नायलॉन मांजाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय.

Breaking News : सदावर्तेंना धक्का! ST बँकेच्या संचालक पदावरुन सौरभ पाटील यांची हकालपट्टी

तर हद्दपारीचीही कारवाई 

या काळात नायलॉन मांजाची विक्री, खरेदी, वाहतूक तसेच नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर दुसऱ्यांदा नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास थेट हद्दपारी अथवा तडीपारीची कारवाई केली जाणार. नाशिक पोलिसांनी तशी अधिसूचना जारी करून नायलॉन मांजाचा वापर न करण्याचं आवाहन केले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply