North India : उत्तर भारतात आभाळ फाटलं, ५ राज्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत, हिमाचलमध्ये ५४ मृत्यू

Delhi News : उत्तर भारतामध्ये पावसाचा कहर सुरु आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पूरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

एकट्या हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ (NDRF) आणि लष्कराच्या जवानांकडून (Army Jawan) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या ६ दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचलमध्ये गेल्या २४ तासांत ३९ ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. बियास नदीच्या प्रवाहामुळे अनेक घरं वाहून गेल्या आणि पूल देखील कोसळले आहेत.

गेल्या ७२ तासांत देशांतील विविध राज्यांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 34 जणांचा, हिमाचल प्रदेशमध्ये ५४ जणांचा, जम्मू-काश्मीरमध्ये 15 जणांचा, दिल्लीत 5 जणांचा आणि राजस्थान आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये ९२ जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आतपर्यंत ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हिमाचलमधील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Accident : मुंबईत भीषण अपघात; भरधाव ट्रकची ४ दुचाकींना धडक, वाहनांचा अक्षरश: चक्काचूर

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये मध्य प्रदेशातील पर्यटकांच्या वाहनांवर दरड कोसळली. या अपघातात इंदूरच्या ४ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत.दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नदीचे पाणी २०६.३२ मीटरने वाहत होते.

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे आलेल्या पूरात उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. बुधवारपर्यंत उत्तरप्रदेशच्या ६५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारकडून मदत आणि सहकार्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply