मुंबई : राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट; पोलीस आयुक्त संजय पांडेंनी दिली महत्वाची अपडेट

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्व आणि मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र आता मनसे कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवण्याची मोहीम हाती घेतली आहे. मशिदीवरील भोंगे हटवण्याची भूमिकेवर आक्रमक होत राज ठाकरेंनी औरंगाबादेत सभा घेतली होती. औरंगाबादमधल्या सभेत कायदा मोडल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणासहित अनेक महत्वाच्या मुद्द्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची अपडेट दिली आहे. 

आज मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये झालेल्या गुन्ह्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पांडे म्हणाले, आम्हाला अजामीनपात्र वॉरंट मिळालं होतं. आम्ही त्यावर काम करणार आहोत. आम्ही त्यांनाही कल्पना दिलेली आहे. ते स्वत: कोर्टात जाऊ शकतात किंवा आम्ही त्या ऑर्डरवर काम करू शकतो'.

खान पिता-पुत्रांना मिळालेल्या धमकीपत्रावर पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणाले,'जे पत्र सलमान खान आणि त्यांचे वडील सलीम खान यांना नावाने आलं आहे ते पडताळलं जात आहे. त्यानुसार आम्ही तपास करतोय. जो तपास होणे आवश्यक आहे, त्यानुसार तपास करतोय. सुरक्षा वाढवणे ही आमची अंतर्गत बाब असून आम्ही त्यानुसार काम करत आहे. हे पत्र कुठून आलं त्यावर आम्ही आताच काही बोलणं योग्य होणार नाही. आम्ही त्या पत्राचा तपास करतोय. जे पत्र आलं आहे, त्यावर आताच कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही. त्यातील सांकेतिक चिन्हावरून निष्कर्ष काढणं योग्य नाही'.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply