NMC Election News : आधी लोकसभा, मगच महापालिका निवडणुका; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारी

NMC Election News : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळाची जुळवाजुळव सुरू केली असून, महापालिकेकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे.

त्यामुळे आता डिसेंबरअखेर दृष्टिपथात असलेल्या महापालिकेच्या निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीनंतरच होतील, असे जवळपास स्पष्ट झाले आहे. याबाबत नाशिक महापालिकेलादेखील पत्र प्राप्त झाले आहे.

Gunaratna Sadavarte Car Vandalizedtion : सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्यांचा डोंबिवलीत सत्कार; घराचा पत्ता शोधण्यासाठी सोशल मीडिया वापरल्याची माहिती

त्यामुळे आधी लोकसभेच्या निवडणुका व त्यानंतरच महापालिकेच्या निवडणुका, असे धोरण स्पष्ट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच महापालिकेच्या निवडणुका होतील हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

लोकसभेनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका असल्याने दोन्ही निवडणुका एकाच वेळेस घेण्याचे येथील नियोजन सुरू आहे. मात्र सरकारविरोधी लहरीचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या निवडणुका आणखी लांबण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक महापालिकेसह राज्यातील १८ महापालिकेची मुदत १५ मार्च २०२२ ला संपुष्टात आली. त्यानंतर लगेचच निवडणुका होणे अपेक्षित होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निवडणुकांची तयारीदेखील केली. प्रभागरचना व मतदारयादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले. परंतु, ओबीसी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाचा दावा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रभागरचनेवरूनदेखील न्यायालयात दावा दाखल झाल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या चौकटीत अडकली.

परंतु असे असले तरी राज्य सरकार न्यायालयात प्रखरपणे भूमिका मांडून निवडणुकांचा मार्ग सुखकर शकले असते. परंतु, राज्यातील राजकीय घडामोडींमुळे राजकारणाची घुसळण व त्यातून नकारात्मक वातावरण तयार होण्याची भीती निर्माण झाली.

त्यातून निवडणुका लांबणीवर टाकल्या गेल्याचे बोलले जात आहे. प्रशासकीय राजवट लागू असलेल्या महापालिका,  जिल्हा परिषद व नगर परिषदांचे मुख्य अधिकारी यांचा थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क असल्याने राजकीय ढवळाढवळ फारशी होती नसल्याने तेदेखील एक कारण निवडणुका न घेण्यामागे सांगितले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply