Nitish Kumar News : 'जेडीयू'मध्ये मोठी उलथापालथ, लल्लन सिंह यांचा राजीनामा; नितीश कुमार पक्षाचे नवे अध्यक्ष

Nitish Kumar News : 'आगामी लोकसभा निवडकीच्या आधी जनता दल युनायडेट पक्षात मोठा बदल झाला आहे. राजधानी दिल्लीत आयोजित जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्यानंतर पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून नितीशकुमार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणूकांच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच बिहारमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या जेडीयूमध्ये  मोठा बदल करण्यात आला आहे. जनता दल युनायटेडच्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

PM Modi : पंतप्रधान मोदींचा उद्या अयोध्या दौरा, रेल्वे स्टेशन अन् विमानतळाचे उद्घाटन, तब्बल 11,100 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी

दिल्लीमध्ये जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांनी राजीनामा दिला. ज्यानंतर नितीश कुमार यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली आहे.

विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये  पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून कोणाचे नाव येणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. इंडिया आघाडीमधील अनेक बडे नेते यासाठी इच्छुक आहेत. ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. या चर्चा सुरू असतानाच जेडीयूमध्ये मोठा बदल करण्यात आला असून नितीश कुमार यांची पुन्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply