Nitin Gadkari : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Nitin Gadkari Threat : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. सोमवारी (१५ मे) गडकरी यांच्या कार्यालयात फोन वाजला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहिती कार्यालयाने दिल्ली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील याआधी देखील नितीन गडकरी यांना दोनवेळा जीवे मारण्याच्या धमकी आल्या होत्या. १४ जानेवारी रोजी गडकरी यांना नागपूर कार्यालयात पहिला धमकीचा फोन आला होता.

जयेश पुजारी नावाच्या व्यक्तीने पहिल्यांदा हा धमकीचा फोन केला होता, त्यानंतर त्याने १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. २१ मार्च रोजी दुसऱ्यांदा त्यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देण्यात आली. दुसऱ्यांदा फोन केला असता त्याने १० कोटी रुपयांची खंडणी मागितली.

दरम्यान, नितीन गडकरींना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी  अटक केली होती. जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला गेली होती. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर येथील तुरूंगात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश पुजारीचे पीएफआय, लष्कर-ए-तैयबा आणि दाऊद इब्राहिम टोळीच्या सदस्यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत. तो सध्या नागपूर जेलमध्ये आहे. मात्र, एकीकडे गडकरींना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पुन्हा धमकी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या दिल्ली पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply