Nitin Gadkari : बावधन बुद्रूक येथील २४ मीटरच्या रस्त्यासाठी गडकरीकडे साकडे

पुणे : बावधन बुद्रूक येथील पौड रस्त्याकडून मुंबई- बंगलोर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची जागा ताब्यात येऊन देखील २४ मीटर रुंदीचा रस्ता न केल्याने या परिसरात राहाणाऱ्या नागरिकांना रोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता त्वरित करावा अशी मागणी येथील सोसायट्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

चांदणी चौकाच्या परिसरात बावधन बुद्रूक येथे २४ मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता पुढे ६५ मीटरच्या रिंगरोडला जाऊन मिळणार आहे. या रस्त्याच्या परिसरात विंडमील, स्टारगेझ, पद्मावती हिल्स, आदित्य निसर्ग यासह याभागातील अनेक सोसायट्यांना हा रस्ता अद्याप झालेला नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

बावधन बुद्रूक येथे पौड रस्त्यावरून  मुंबई- बंगलोर महामार्गाला जोडणारा रस्त्यासाठी जागा संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी पीएमआरडीएकडे हस्तांतरित केली आहे. हा रस्ता आपल्या विभागाकडून करून दिल्यास पौड रस्त्याकडून हिंजवडीकडे जा ये करण्यासाठी सोईचा ठरेल. तसेच हा रस्ता झाल्यास महामार्गावरील ताण कमी होईल व चांदणी चौकातील वाहतूक कोंडीही कमी होईल, अशी मागणी सचिन बालघाटे यांनी दिली.

तसेच या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते अजित पवार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आणि पुणे महापालिका आयुक्तांकडे सादर केले आहे.

हा रस्ता असा आहे उपयुक्त

- बावधन बुद्रूक येथे मोठ्याप्रमाणात बांधकाम सुरू असल्याने लोकसंख्या वाढत आहे

- पौड रस्त्याकडून पुण्याकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे

- २४ मीटरचा रस्ता केल्यास स्थानिकांचे रोजचे ६ किलोमीटरचे अंतर कमी होईल

- इंधन बचतीसह प्रत्येक फेरीत १० ते १५ मिनिटे वेळ वाचेल.

- वाहनांचे कार्बनचे उत्सर्जन कमी होईल

- ६५ मीटरच्या रिंगरोडसाठी हा २४ मीटरचा रस्ता उपयुक्त ठरले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply