Nitesh Rane : तेव्हा संजय राऊतांचा भाऊ अमित भाईंच्या घराभोवती किती फिरायचा, फोटो दाखवावे लागतील, नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane : अमित शाह यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केला होता. त्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदारसंजय राऊतांनी उत्तर दिले. अमित शाह मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले? हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःला विचारावा, त्यावेळेस ते मातोश्री वर होते का? मी होतो, असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांना भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार टोला लगावला आहे. 

नागपूर ....... येथे पत्रकारांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की,उद्धव ठाकरे  सारखा खोटारडा माणूस महाराष्ट्रात नाहीये, हे सगळ्या जनतेला माहित आहे. अमित शाह यांनी दिलेला शब्द पाडण्याची विश्वासार्हता फार मोठी आहे.  संजय राऊत म्हणतायेत मातोश्रीत बैठक झाली, असा दावा करत असले तरी संजय राजाराम तिथे होता का? तर हा तिथे नव्हता. तिथे होते असा कुठलंही शब्द दिला नाही. उगाच नाक रगडत शेंबड्या मुलांसारखं बोलण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही, असा पलटवार नितेश राणे यांनी एकेरी उल्लेख करत केला आहे. 

Pune Crime News : पुण्याचे फर्जी? घरातच छापल्या नोटा; बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक, पुण्यातील हिंजवडीतील घटना

...तर फोटोग्राफ जाहीर करावे लागतील

संजय राऊतांच्या शब्दाला महाराष्ट्र  सोडा, त्याच्या घरात तरी त्याच्या शब्दाला मान आहे का? असेही त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत हे जेलमध्ये होते तेव्हा तुमचा भाऊ अमित भाईंच्या घराभोवती किती फिरायचा, त्याचे फोटोग्राफ आम्हाला जाहीर करावे लागतील, असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply