Nilesh Lanke : दिल्लीत इंग्रजीत भाषण करणार, विखेंच्या मंचावरील नेत्यांनीही केली मदत; विजयानंतर निलेश लंके नेमकं काय म्हणाले?

Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण करणार आहेत. विजयानंतर निलेश लंकेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की, सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलाय, तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढील पाच वर्ष त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहे.

सुजय विखे यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंग्रजी भाषेवरून निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. यालाच आता लंकेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी थेट दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण करणार असल्याचं म्हटलं आहे. सुजय विखेंना यंदा निलेश लंकेंनी पराभवाची धूळ चारली आहे. सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये मोठी चुरशीची लढत नगरमध्ये झाली आहे.

Akola Rain : अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस; अनेकांचे संसार उघड्यावर, केळी पिकाचे मोठे नुकसान

पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचं निलेश लंकेंनी म्हटलं आहे. शेतकरी सुखी झाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि माझ्या मतदारसंघात पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी उद्यापासूनच कामाला लागणार असल्याचं निलेश लंके म्हणाले आहेत. त्यांनी विजयाचे श्रेय हे महाविकास आघाडीतील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाने देखील हातात घेतल्याचे लंके म्हणाले आहेत.
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply