मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव; पुण्यात आढळले सात रुग्ण

मुंबई : कोरोना विषाणूननं पुन्हा एकदा डोक वर काढलं असून B.A.4 आणि B.A.5 या दोन व्हेरियंटनं आता महाराष्ट्रात शिरकाव केल्यानं चिंतेत भर पडली आहे. पुण्यात या दोन्ही व्हेरियंट्सचे मिळून एकूण सात रुग्ण आढळून आले आहेत. 

B.A. 4 आणि 5 या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटमुळं सध्या जगाला पुन्हा एकदा काळजीत टाकलं आहे. महाराष्ट्रात हा व्हेरियंट दाखल झाला तो पुण्यात. पुण्यात एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत यांपैकी B.A. 4 व्हेरियंटचे ४ तर B.A. ५ व्हेरियंटचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. जिनोम सिक्वेंसिंग अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या चोवीस तासात ५२९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ३२५ उपचार घेत असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट ९८.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. आज कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *