New Bat Coronavirus in China : जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट? चीनच्या व्हायरसमुळे जग चिंतेत

New Bat Coronavirus in China : कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वूहान लॅबमध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळलायं...हा विषाणू चीन बाहेर पसरल्यास संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जातेय..विशेषतः लहान मुलांना या व्हायरसचा धोका जास्त आहे. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे...त्यामुळे सर्व देशांचं टेंशन वाढलंय. चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात....

चीनच्या नव्या व्हायरसने जगाला धडकी

'HKU5' हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस

हाँगकाँगमधल्या जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला

कोव्हिड-19 ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू

जनावरांमधून माणसामध्ये होतो HKU5 विषाणूचा संसर्ग

ACE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका

नव्या विषाणूचा लहान मुलांना सर्वाधिक धोका

महाभयंकर विषाणू आढळल्याचं साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी झेंगली या अभ्यास संस्थेने दुजोरा दिलाय. 5 वर्षांपेक्षा लहान मुलं, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना या संसर्गाचा धोका अधिक असतो त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी? पाहूयात..

Anant Bhave : मराठी साहित्याचा शिलेदार काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ मराठी साहित्यिक अनंत भावे यांचे निधन

नव्या विषाणूपासून काय काळजी घ्याल?

मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा

शिंकताना, खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा

आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळा

चीनमध्ये निर्माण झालेला हा नवा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि मुलांचीही काळजी घ्यायला हवी... एवढंच नाही तर प्रशासनानेही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply