Nerul Murder Case: नेरुळमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा! 25 वर्षांपूर्वी केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिली 25 लाखांची सुपारी

Nerul Murder Case: नवी मुंबईत 15 मार्च रोजी दिवसाढवळ्या रियल इस्टेट एजंटची गोळ्या झाडून करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली असून मृत सावजीभाई पटेल यांनी आपल्या गुजरातमधील मूळ गावी 25 वर्षांपूर्वी केलेल्या एका खूनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

ही हत्या घडवून आणण्यासाठी बिहारमधील 3 जणांना हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार दैनंदिन रेकी करुन सावजी पटेल यांची नेरुळमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मेहेक नारिया, कौशल यादव, गौरवकुमार यादव आणि सोनुकुमार यादव या चौघाना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हत्येच्या कटात सहभागी इतर आरोपींचा शोध देखील पोलीस घेत आहेत.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी 15 मार्च रोजी नवी मुंबईतील नेरुळ भागात एक व्यवसायिक सावजी पटेल यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. अतिशय संवेदनशील प्रकरण असलेल्याने पोलिसांच्या वेगेवगळ्या पथकांनी मिळून या प्रकरणाचा कसोशीने तपास केला आणि आरोपींना अटक केली आहे. 

या गुन्ह्याचे मूळ गुजरातमध्ये असून जून्या वाद्यातून ही हत्या झाली अशी माहिती देखील भारंबे यांनी दिली. मृत व्यवसायिकाने 1998 मध्ये मूळ गावी केलेल्या एका हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येसाठी 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply