
Neral Crime : कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवपाडा गावात भयंकर घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या तरूणाची त्याच्या बायकोच्या प्रियकरानेच हत्या केली.
शिकारीसाठी जंगलात नेऊन तिथे डोक्यात गोळी घातली आणि हत्येनंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. ही घटना उघड झाल्यानंतर नेरळ परिसरात खळबळ उडाली आहे.
नेरळ पोलिसांनी शनिवारी तरुणाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश तुपे (वय २४) आणि अरुणा मुरबे (वय ३६) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. सचिन मुरबे (वय ३८) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
सचिन मुरबे हा कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील रहिवासी होता.रिक्षा चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. १५ जुलै रोजी सचिन मुरबे हा बेपत्ता झाला होता. त्याबाबत त्याची पत्नी अरुणा हिनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सचिन आणि ऋषिकेश हे दूरचे नातेवाइक आणि मित्रही होते.
|
Ajit Pawar : पूरग्रस्तांना तातडीने १० हजारांची मदत दिली जाणार, अजित पवारांची विधानसभेत घोषणा |
पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी सचिन आणि संशयित आरोपी ऋषिकेश हे दोघे आरी जंगलात शिकारीसाठी गेल्याची माहिती कॉन्स्टेबल प्रवीण लोखंडे यांना मिळाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार,शिकारीसाठी सोबत नेलेल्या बंदुकीची गोळी झाडून सचिनची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलातच खड्डा खोदून पुरला. त्यानंतर त्याचे दोन्ही फोन जंगलातील ओढ्यात फेकून दिले. कुदळ आणि फावडा वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते, असेही आरोपीने सांगितले.
ज्या ठिकाणी सचिनला पुरले होते, त्या ठिकाणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेशला नेले. सचिनचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

