Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा

Neena Gupta Interview : बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नीना गुप्ता यांची गणना केली जाते. सध्या नीना गुप्ता ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'पंचायत ३' वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अभिनेत्रीने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, आपल्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल भाष्य केले आहे.

१९८२ पासून अभिनेत्री नीना गुप्ता इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. आज जरीही त्या फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरीही त्यांच्यासाठी स्ट्रगलचे दिवस फार कठीण होते. नुकतंच अभिनेत्री स्ट्रगलच्या दिवसांबद्दल एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?

नीना गुप्ता मुलाखतीमध्ये म्हणाल्या, "माझे स्ट्रगलचे दिवस खूपच कठीण होते. मी दिल्लीतून मुंबईमध्ये आले होते. जेव्हा मी मुंबईमध्ये आले त्यावेळी मला हे शहर खूप अवघड वाटायचे. मी काही दिवसातच पुन्हा दिल्लीला जायच्या विचारात होते. मी शिकलेली होती, त्यामुळे दिल्लीत जाऊन पीएचडी करण्याच्या विचारात होते. पण मुंबईमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी फार स्ट्रगल आहे."

पुढे मुलाखतीमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या, "मुंबईतून जायचा विचार जरीही करत असले तरीही मला एका रात्रीत कोणी तरी काम देऊन थांबवण्याचा प्रयत्न करतं. असं माझ्या सोबत अनेकदा घडलं आहे." नीना गुप्ता यांचा फिल्मी प्रवास फार प्रेरणादायी ठरला आहे. त्यांचा चढ उतार अनेक चढ उतारांनी भरलेला होता. मी करियरच्या अशा वळणावर होते, जिथे मी अनेक भूमिकेंसाठी नकार दिलेला आहे, असं मुलाखतीत नीना गुप्तांनी सांगितलं आहे.
 
अनेकदा नीना यांना ट्रोलर्स 'बोल्ड अभिनेत्री'ही म्हणून बोलतात, त्यांनाही प्रत्युत्तर दिले आहे. "मी वेगवेगळ्या धाटणीचे रोल केलेले आहे. पण, मला माहित नाही तो टॅग कसा पडला. माझी तशी प्रतिमा मीडियाने तयार केलेली आहे." सध्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्रीने 'पंचायत ३'मध्ये प्रधानजींच्या पत्नीची म्हणजे, मंजू देवीची भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजमधील अभिनयाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply