NCP Next President: राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजी ठरणार?, गठीत समितीची उद्या होणार महत्वाची बैठक

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार यावर जोरदार चर्चा होत आहे. शरद पवारांनतर हे पद सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अशामध्ये अध्यक्ष निवडीसाठी गठीत केलेली समितीची 5 मे रोजी बैठक होणार आहे. त्यामुळे उद्याच एनसीपीचा नवा अध्यक्ष (NCP Next President) ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नेमलेल्या समितीची उद्या म्हणजे 5 मे रोजी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार की शरद पवार यांच्याकडेच हे पद राहणार हे स्पष्ट होईल.

शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या या निर्णयाचा विरोध करत अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शरद पवारांच्या या निर्णयामुळे भावुक होत या सर्वांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली. कार्यकर्ते भावनिक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या समितीची घोषणा करण्यात आली. ही समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे शरद पवारांनी सांगितले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कमिटीची बैठकी 6 मे रोजी होणार होती. पण शरद पवारांनी सूचना करत ही बैठक उद्या म्हणजेच 5 मे रोजी घेण्यात यावी अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर आता या समितीची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार हे ठरण्याची शक्यता आहे.

जर शरद पवार हे आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले तर त्यांची कन्या सुप्रिया सुळे याअध्यक्ष होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply