NCP MLA Disqualification Verdict : अजित पवार यांचे सर्व आमदार पात्र; शरद पवार गटालाही दिलासा,निकाल नेमका कोणाच्या बाजुने लागला?

NCP MLA Disqualification Verdict : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल दिला. दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नसल्याचं म्हणत राहुल नार्वेकरांनी अजित पवार यांचे सर्व आमदरांना पात्र ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या दोन्ही बाजूची मते ऐकल्यानंतर आपला निर्णय दिला.

नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार निकाल जाहीर केला. निकाल देताना शिवसेना आमदारांबाबत दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला. दरम्यान निकालाचे वाचन होत असताना शरद पवार गटाकडून एकही आमदार उपस्थित नव्हता. फक्त एक वकील उपस्थित होता. राहुल नार्वेकर यांनी एकूण ५ याचिकांवर निर्णय दिला. याचिकेतून राहुल नार्वेकर यांनी दोन स्वतत्र निर्णय दिले. मूळ पक्ष आपला असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आल्याचं नार्वेकर म्हणाले.

Peacock Feather Smuggling Case : न्हावा-शेवा बंदरातून २ कोटी रुपयांच्या मोरपिसांची तस्करी, डीआरआय विभागाची मोठी कारवाई

आमदार अपात्र करण्याआधी आधी मूळ पक्ष कोण आहे ते ठरवावं लागेल, असं म्हणत नार्वेकरांनी आधी राष्ट्रवादी कोणाची हा निर्णय दिला. निकालाचं वाचन करताना राहुल नार्वेकरांनी विविध मुद्दे मांडले. राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणात निरीक्षण नोंदवलं.

विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे ४१ आमदारांचं पाठबळ आहे. पक्षीय रचना पाहता कुठला गट हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो. हे प्रथमदर्शनी सांगता येणार नाही. पण विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष असल्याचं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं. त्यामुळे अजित पवार गटाचीच राष्ट्राावादी खरी असल्याचा निर्वाळा नार्वेकरांनी दिला.

पक्ष कुणाचा? याचा निकाल जाहीर केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. याबाबतच्या दाखल सर्व याचिका रद्द करत नार्वेकरांनी अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचा निर्वाळा दिला. शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळ्या. यावेळी राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं.

आमदार अपात्रेताच निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी अतिशय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं.“नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणी सोबत सध्या युती आणि आघाडी होत आहे. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर १० व्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे १०व्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नसल्याचं , विधानसभा अध्यक्ष म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply